अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

"मी हरलो नाही!!
 मृत्युच्याही डोळ्यात पाहुन
 अखेर मी हरलो नाही!!

 मी एकटा ही नाही!!
 अंताच्या या प्रवासात
 अखेर मी एकटा नाही!!

 ही वाट ही पुढची नाही!!
 प्रवास हा अनंताचा जिथे
 अखेर ही वाट पुढची नाही!!

 मला आता शोधत ही नाही!!
 वाट पहाणारी कोण ती
 अखेर मला शोधतही नाही!!

 मी सापडत ही नाही!!
 डोळ्यात साठवत तिला
 अखेर मी सापडत ही नाही!!

 मी क्षणात दिसणार ही नाही!!
 ह्रदयात सर्वाच्या रहाणारा मी
 अखेर क्षणात दिसणार नाही!!

 आगीत आता झुंज ही नाही!!
 आयुष्यभर लढणाऱ्या माझी
 अखेर आगीत झुंज नाही!!

 मी हरलो नाही!!
 राख होऊनही जगताना
 अखेर मी हरलो नाही!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

वाट || VAAT MARATHI KAVITA ||

Wed May 31 , 2017
मी वाट पाहिली तुझी पण तु पुन्हा आलीच नाही वाटेवरती परतुन येताना तुझी सोबत भेटलीच नाही क्षणात खुप शोधताना तुला स्वतःस मी सापडलो नाही मी आणि तुझ्यात तो माझाच मी राहिलो नाही