"मी हरलो नाही!! मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही!! मी एकटा ही नाही!! अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही!! ही वाट ही पुढची नाही!! प्रवास हा अनंताचा जिथे अखेर ही वाट पुढची नाही!! मला आता शोधत ही नाही!! वाट पहाणारी कोण ती अखेर मला शोधतही नाही!! मी सापडत ही नाही!! डोळ्यात साठवत तिला अखेर मी सापडत ही नाही!! मी क्षणात दिसणार ही नाही!! ह्रदयात सर्वाच्या रहाणारा मी अखेर क्षणात दिसणार नाही!! आगीत आता झुंज ही नाही!! आयुष्यभर लढणाऱ्या माझी अखेर आगीत झुंज नाही!! मी हरलो नाही!! राख होऊनही जगताना अखेर मी हरलो नाही!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
