"राहिले काहीच नसेन तेव्हा माझा तिरस्कार ही करू नकोस तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात एक छोटी जागा मात्र ठेव!! वेडावला असेन धुंद वारा मुक्त झाल्या असतील भावना तुला त्रास देण्यास तेव्हा त्याला नको म्हणू नकोस!! कधी येईल एक सर तुला पाहण्यास सहज त्या सरी मधे भिजण्यास खूनावेल ते आभाळ असेच!! सांग कशी असेल आपली वाट पुढच्या एकांताची माझ्या विरहात तू तेव्हा स्वतः स हरवूशन जाण्याची!! पण एक खंत आहे मनाची शेवटच्या त्या शब्दाची अबोल त्या तुझ्या मनास उगाच दोष देऊ नकोस!! काही उरले असेन कदाचित ठेव जपून तळाशी कधी अश्रू सोबत आलेच तर माझ्या कवितेस तू वाचू नकोस !!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
