भाग १

“कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कारण काळाने तो बोथट करून टाकला. आणि तुझ्याही मनात आता काही नसाव असं मला वाटत!” योगेश प्रियाकडे पाहत म्हणाला.
त्या अचानक घडलेल्या भेटीत तिला काय बोलावं तेच कळेना .कित्येक काळ लोटून गेला पण योगेश आजही तसाच आहे याचं तिला नवल वाटत होत. कॉफी शॉप मधल्या त्या भेटीत तिच्यासाठी तो एक सुंदर क्षण होता. कारण कितीही झाल तरी तो तिचा जुना मित्र होता. कदाचित त्या कॉफी मध्ये ते जुने क्षण पुन्हा आठवले जातं होते.
“नाहीरे त्यावेळीही नाही आणि आताही माझ्या मनात काही नाही आपल्या नात्याबद्दल! ” प्रिया कॉफीचा कप हातात घेत म्हणाली.
“मग पुन्हा कॉन्टॅक्ट करावसाच वाटला नाही कधी?
“नाही!!”
“म्हणजे तुझ्या मनात आजही माझ्या बद्दल राग आहे तर?”
“नाहीरे!!” पण पुन्हा धिरच नाही झाला तुला बोलायचं!!”
“वेडे आपल्यातले नाते एवढं कमजोर न्हवते की ते असे संपून जावे!! योगेश प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. प्रियाला त्यावेळी योगेशकडे पाहणं अवघड चालल. कदाचित नात्यांमधले अंतर त्यावेळी नजर चोरत होते.
“पण मला आजही याचं दुःख वाटत की कोण तिरहाईक माणसाने आपले इतके सुंदर नाते मोडले. योगेश तुला आठवत तु मला रोज भेटायचास. कधी शक्य नाही झाले तरी फोन मेसेजेस करायचा. पण मला वेडीला ते कधी कळलंच नाही. तूषारच्या आधीपासून तु माझ्या आयुष्यात होतास. पण मी कधीच तुला ओळखु शकले नाही.”
“मी तरी कुठे माझ्या मनातल तुला सांगायचो सांग ना!! योगेश प्रियाकडे एकटक पाहत होता. कारण नात्यामध्ये दोघेही तितकेच हरले होते.
“त्याचवेळी मनातल सांगितलं असत तर कदाचित आपण असे नसतो भेटलो!” प्रिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती.
“सांगितलं असत तरी वेळ निघून गेली होती!! कारण तेव्हा तु माझ्या पासुन खूप दूर गेली होतीस. नकळत तु माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस! आणि ते सहन करण्यासारखं न्हवते. जी व्यक्ती कधीच आपल्या पासुन दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमके तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाही होत. आणि मी केलही नाही. आणि जे काही त्यानंतर झाल त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन. कारण शेवटी निर्णय तुझा होता!!” योगेश भावनिक होऊन बोलत होता. कित्येक शब्दांचे भावणेचे बांध आता तुटले होते.
“माझही चुकलं होत त्यावेळी!!” कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मी तुला सांगायला हवं होत. तुला नेहमी मी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते. पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे!!” प्रिया कॉफीकडे पाहत म्हणाली.
“बघना दिवसरात्र एकमेकांशिवाय न राहणारे आपण प्रत्येक क्षणाला बोलणारे आपण कित्येक वर्षाने भेटतोय.”
“होना आणि तुला कधीच आठवण नाही आली माझी!!” प्रिया योगेशला भावनिक होऊन विचारत होती.
“आली ना!! खूप वेळा आली पण तु काही भेटली नाहीस पुन्हा!! Actually तु दिलेला तो pen आजही माझ्यकडे आहे!! ” त्यावेळी तु म्हणाली होतीस आठवत!! की नात जर नीट नाही ना चाललं तर त्यातली refill बदलायची ,नात नाही बदलायच.” योगेश अगदी सहज तिला जुन्या आठवणींत घेऊन जात होता.
“हो नात नाही बदलायच!!. मग तुझ्या मनातल मला का नाही सांगितलं तु!! माझ्यावरचं प्रेम का नाही सांगितलस मला!! या प्रश्नानं योगेश गोंधळून गेला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
“चल मी निघतो आता!! ” प्रिया योगेशला थांबवत होती पण योगेशची नजर तिला पाहतच न्हवती.
“नाही योगेश माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला!!” प्रिया पुन्हा पुन्हा त्याला बोलत होती.
नक्की देईन पण आता नाही!! योगेश जाण्यास निघाला होता. पुन्हा तिला भेटण्याचं वचन देऊन.

पण प्रिया तिथेच होती. संपलेला कॉफीचा कप खूप काही तिला बोलत होता. नात संपले तरी त्याची सुरवात पुन्हा करण्यास सांगत होता. कदाचित मनातलं सगळं सांगायला ते नात पुन्हा जोडत होता..

आणखी वाचा:  सहवास (कथा भाग ३) || MARATHI LOVE STORY ||

क्रमशः

-योगेश खजानदार

Share This: