भाग ५
मनातल सगळ सांगायचं म्हणून योगेश प्रियाला दुसऱ्या दिवशी भेटायला निघाला. आज योगेश येईन तिला घेऊन जायला म्हणून प्रिया ही सकाळपासून आवरत होती. क्षणाची गती थोडी कमी झाली होती अस तिला वाटत होत. दुपारच्या वेळी अचानक योगेश प्रियाच्या घरी आला.
“सकाळ पासुन वाट पाहतेय तुझी मी!!” प्रियाला मनातली ओढ लपवताच आली नाही.
“सॉरी यायला थोडा उशीरच झाला!”योगेश ही गमतीने म्हणाला.
“आई मी येते!!”
“योगेशला घरात तरी येऊ दे!!”प्रियाशी आई एकदम म्हणाली.
“नको काकू!! असही बाहेरच जायचं होत आम्हाला!!”
दोघे आज कित्येक वर्षांनी एकत्र होते. प्रियाचा तो योगेश पासुन झालेला दुरावा आज स्पष्ट दिसत होता. कित्येक वर्षांच अंतर हळूहळू कमी होत होते. योगेश प्रियाला एका सुंदर समुद्र किनारी घेऊन गेला. त्या लाटांचा आवाज दोघान मधील शांतता भंग करत होती.
“तुझ्या मनातली ओढ, मला भेटण्याची का बरं जाणवते!! योगेशने प्रियाला विचारलं.
तो आता बोलायला होता मनातल सगळ सांगायला होता.
“तुषारने एवढ मनापासुन प्रेम करूनही माझ्यासाठी तुझ्या मनात जागा का आहे ?” योगेश भावनेच्या भरात बोलत होता.
“कारण तुझ्या अबोल मनानेही तेवढच प्रेम केलं आहे माझ्यावर!! तुला आठवत तु मला एकदा तुझी काविता ऐकवली होतीस!!
अबोल मनातले माझ्या
शब्द किती बोलके
सांगू कसे तुला मी
ओठांवर का विरते !!!
तेव्हाच तुझ माझ्यावरचं प्रेम मला कळलं होत!!
“पण तूही कधी मला तुझ प्रेम नाही सांगितलस !!” योगेश प्रियाला म्हणाला.
“कारण माझेही शब्द ओठांवरच विरून जायचे!!” प्रिया योगेशच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
“तूषारला कधी विसरून जाशील??”
“कधीच नाही!! त्यानेच तर प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितले मला!!”एखाद्यावर जीवापाड प्रेम करायचं, इतकं की आपला शेवटचा श्वास त्याला द्यायचा!!” प्रिया अश्रू पुसत बोलत होती.
“खरंच मी तुषारला ओळखूच शकलो नाही!! माझ्या मनाची ती अवस्था मला सांगता ही येत नाही! तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत असतानाही तु तुषार सोबत का गेलीस याने मी पुरता हरवून गेलो!! तुझा तिरस्कार करावा म्हटल तर तेही जमल नाही! त्या दिवशी तु अचानक coffee shop मध्ये मला विचारलस आणि मी गोंधळून गेलो!! त्या लाटांचा आवाज आता विरून गेला होता योगेश प्रियाला बोलत होता. तिही आता सगळं मनापासुन ऐक होती.
“पण आता नाही!! प्रिया मला तुझी साथ हवी आहे!! अगदी कायमची!! हे अंतर आपल्यातलं मला संपवून टाकायचं !!! तु ही अबोल नसाविस आणि मीही अबोल न रहावा !! तुझ्या प्रत्येक क्षणावर मला प्रेम करायचं आहे !! तुषारने तुला प्रेम म्हणजे काय असतं हे सांगितलं आणि मला तू !! योगेश प्रियाचा हात हातात घेऊन म्हणत होता. प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते.
“माझ्या डोळ्यातली ओढ तुला कधीच कळली नाही! तरीही मी तुझी वाट पहायचे!! ती या क्षणासाठीच !!की कधीतरी तू येशील आणि मला माझी साथ मागशील!! पण आज तूषारच्या आठवणीच घरचं आता मला छान वाटतेय ! ” प्रिया योगेशकडे पाहतच न्हवती.
“तुषारला विसरून जा अस मी कधीचं म्हणार नाही तुला !! “
“पण पुन्हा अबोल होऊन निघून गेलास तर मी क्षणभर ही जगू नाही शकणार!!”
“आता अबोल रहावस वाटत नाही प्रिया !! एक एक क्षण तुझ्याचसाठी द्यावा अस मन बोलतेय !! देशील माझी साथ कायमची ??? योगेश अगदी शांत विचारत होता.
कित्येक वेळ प्रिया काहीच बोली नाही. तो समुद्र किनारा आता सांजवेळी गुलाबी किरणांनी नाहून निघाला होता!! मंद वारा जणु पुन्हा पुन्हा घिरट्या घालत होता जणु दोघांचं बोलणं चोरून ऐकत होता.
“मला कधीच सोडून नाहीस ना जाणार योगेश?? मी अबोल झाले तर माझी समजूत काढशील ना?? तुझ्या आणि माझ्या मधील या अंतराचा शेवट त्या सूर्यास्तात जणु होतोय अस मला वाटतं आहे!! प्रिया मंद हसत योगेशकडे पाहत होती आयुष्यभराची साथ द्यायचं वचन जणु देत होती.
“या प्रत्येक क्षणावर तुझाच नाव असेन आता प्रिया!! तुझा हात कधीच मी सोडणार नाही !! योगेश तिच्याकडे पाहत म्हणाला.
कित्येक वेळ प्रिया योगेशच्या मिठीत तशीच बसून राहिली. तिकडे तो सूर्यास्त झाला , जणु दोन जीवांच मनाच अंतर अस्तास गेलं. अगदी कायमचं. जणु तो समुद्र किनारा त्याच्याकडे पाहून म्हणत होता..
“ओढ मनाची या,
खूप काही बोलते!!
कधी डोळ्यातून दिसते,
तर कधी शब्दातून बोलते!!
वाट पाहून त्या क्षणाची,
खूप काही सांगते!!
कधी अश्रून मधुन वाहते,
तर कधी ओठांवर विरून जाते!!
न राहवून कधी,
बेभान जेव्हा होते!!
मनातले जणु तेव्हाच,
अंतर ही ते मिटते!!
ओढ मनाची या
दोन जीवास बोलते !!! “
ती सांजवेळ ही जणु दोघांसाठी क्षणभर थांबली होती….