भाग ४

“कवितेत लिहिल कित्येक वेळा तुला पण क्षणात लिहायचं राहूनच गेलं.  या चार ओळी गुणगुणत नाही मी तर माझ मन तस बोलतेय. तुझ्या प्रेमाची सावलीही मी का ओळखु शकलो नाही हेच मला सांगता येत नाही. प्रेम म्हणजे फक्त समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणे नाही तर प्रेम म्हणजे साथ असते, प्रेम म्हणजे आपल्या माणसाच्या हाकेला दिलेली साद असते!!” योगेश त्या रविवारच्या सकाळी फक्त प्रियाचा विचार करत होता. मनातल्या विचारांशी नुसता भांडत होता. प्रियाच्या घरी जाण्यासाठी तोही तितकाच आतुर होता.


प्रिया कित्येक दिवसांनी स्वताला सावरत होती. योगेश कधीही येईल म्हणून सगळं काही व्यवस्थित करत होती. प्रियाची आई तिला मदत करत होती. आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रियाने आतुरतेने दरवाजा उघडला समोर योगेशला पाहून तिला खूप आनंद झाला. कित्येक वेळ दोघे दरवाज्यात घुटमळत होते.


“येणा!! “प्रियाने योगेशला घरात येत म्हटले.
“किती दिवसांनी भेटतोय योगेश!! मला वाटलं विसरूनच गेलास आम्हाला!! प्रियची आई योगेशकडे पाहत म्हणाली.
“कसा विसरेन काकू !! आयुष्यात काही नाती विसरावे म्हटलं तरी नाही विसरता येतं!!” योगेश प्रियाकडे बघत म्हणाला.
तेवढ्यात प्रिया किचन मधेन निघून गेली. योगेश कित्येक दिवसाने घरी आला आहे म्हणून त्याच्यासाठी त्याला आवडते ती कॉफी करायला.
“तुझ्या अस रागावू जाण्याने खूप मनातून कोसळली होती प्रिया!!” आई टेबलावर ठेवलेल्या तुषरच्या फोटो कडे पाहत म्हणाली.
“रागाला घर नसतं ते कुठेही सैरावैरा धावत जात!!” आणि मध्ये येणाऱ्या आपल्या लोकांनाही उध्वस्त करून जात!! मला हे सगळं कळलं पण वेळ तेव्हा निघून गेली होती!!” योगेश प्रियाच्या आईला मनापासुन बोलत होता.
“तूषारच्या आठवणींत प्रिया पुरती कोलमडून गेली होती. एखादी व्यक्ती आपल्यावर जीवापाड किती प्रेम करू शकते याची सतत आठवण करून देत होती. पण तुला पुन्हा भेटण्यासाठीची ओढ काही वेगळीच होती. प्रियाची ती आजची ओढ तिला त्या आठवणीतून दूर घेऊन जात होती!! प्रियाची आई योगेशला पुन्हा प्रियाला सावरायला सांगत होती.
“पण एखादी व्यक्ती आपल्यावर इतकं प्रेम कसकाय करू शकते हेच मला कळेना. एखादया व्यक्तीला कवितेत किवा वहीत लिहन सोप असत पण त्याच्या आयुष्यात येऊन गोड आठवणी देणं खरंच खूप सुंदर असत!!” योगेश कित्येक शब्दाच्या गुंत्याना सोडवायचा प्रयत्न करत होता पण नात्यात ते पुन्हा गुंतत होते.
“श्र्वासांच्या अखेरच्या क्षणात सुधा तुषार फक्त प्रियावर प्रेमच करत होता!!मी गेलो तरी माझ्या आठवणीत रडायचं नाही म्हणून वचन मागत होता!!” प्रियाची आई अश्रू आवरत म्हणाली.
योगेश कित्येक वेळ फक्त निशब्द होता. एखाद्यावर रागावून रुसून जाणं किती सोप असत अस त्याला वाटू लागलं पण एखाद्यावर कोणतीही अपेक्षा न करता प्रेम कारण किती अवघड असत हे कळू लागलं. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती किती अवघड असते मिळणे अस मन सतत बोलू लागल.
“तुझ्या आवडती coffee!!!” प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली.
“थॅन्क्स!!” योगेश प्रियाकडे पाहत म्हणाला. आणि कित्येक वेळ प्रिया कडे पाहतच राहिला. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले तिला आपण साथ द्यायला हवी होती. तिचा निर्णय चुकला नाही तर बरोबरच होता.  आपण कोणावर प्रेम करतो याहीपेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा आपल्यावर पहिला हक्क असतो अस मनात योगेशला वाटू लागलं.
“कित्येक दिवसाने तुझ्या हातची कॉफी पितोय!!”
“आजही याची चव तशीच आहेना ??” प्रिया योगेशला म्हणाली.
“हो !! चव आहे तशीच आहे !! काही फरक नाही!


  कदाचित प्रियाला आपल्या नात्यातली चव तशीच आहे का विचारायचं असेन.अंतर पडतात नात्यात पण त्याची चव बेचव झाली की नाती चागली वाटत नाहीत.उरतात ती फक्त आठवणीची घर. तीपण रिकामी.


कित्येक वेळ योगेश प्रियाच्या घरी थांबला. प्रियाशी तिच्या आईशी मनमोकळेपणाने गप्पा मारत होता. जुन्या कित्येक आठवणी आठवत होता.
“बरं मी निघू आता!!” योगेश प्रियाला विचारत होता.
“वेळ किती आणि कसा गेला कळलच नाही!” प्रिया घड्याळाकडे पाहून म्हणाली.
“होना आपली माणसं जवळ आसले की वेळ कशी जाते कळतच नाहीना !!”
“होना!! उद्या तुला न्हायला येऊन मी ..!! मला तुला काही बोलायच आहे प्रिया !!! भेटशील ना??
“नक्की भेटेन !!” प्रिया मनापासुन हो म्हणत होती.


योगेश आता प्रियाच्या घरातून बाहेर पडला होता. प्रिया योगेश नजरेआड होईपर्यंत दरवाज्यात उभीच होती .

क्रमशः

-योगेश खजानदार

READ MORE

विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG ||

विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG ||

विचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला करतात अगदी…
नातं माझं || NAAT MAJH || MARATHI BLOG ||

नातं माझं || NAAT MAJH || MARATHI BLOG ||

नातं एक असच होतं कधी दुख कधी सुख होतं सुखाच तिथे घर होतं आणि मनात माझं प्रेम होतं कधी माफी…
किल्ला || KILLA MARATHI ESSAY ||

किल्ला || KILLA MARATHI ESSAY ||

दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड, विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया…
ती ||TI || KAVITETIL TI || MARATHI BLOGGER ||

ती ||TI || KAVITETIL TI || MARATHI BLOGGER ||

अगदी सांगायच तर प्रेम हे इतक सुंदर असतं की ते व्यक्त करायला भावनांची जोड लागतेच. मग ते 'ती'ला कळो अथवा…
बार्शी आणि || BARSHI AANI || MARATHI ESSAY ||

बार्शी आणि || BARSHI AANI || MARATHI ESSAY ||

मी अगदी कमी बोलतो असा जर कुणी बार्शी स्थित नागरिक तुम्हाला म्हणाला तर ते कधीच खरं मानु नये.. म्हणजे अगदी…
मन आणि मी || MANN AANI MI || BLOG POST ||

मन आणि मी || MANN AANI MI || BLOG POST ||

सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे…
स्वातंत्र्य की स्वैराचार || BLOG || SWATANTRYA ||

स्वातंत्र्य की स्वैराचार || BLOG || SWATANTRYA ||

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये कुठेतरी गोंधळ होतो आणि सर्वच आयुष्याच्या व्याख्या बदलुन जातात. आम्ही खुप प्रगत आहोत आमची विचारसरणी खुप…
नातं || NATE || MARATHI BLOG||

नातं || NATE || MARATHI BLOG||

एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते…
तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||

तो तसा तर मीपण तसा || MANATLE SHABD ||

एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे…
ब्लॉग || MARATHI BLOG || BLOGGER ||

ब्लॉग || MARATHI BLOG || BLOGGER ||

खरंच खुप छान लिहिता तुम्ही !! एका माझ्या मित्राचा मला काही दिवसा पुर्वी फोन आला. 'तुमच्या कवितेतुन मला माझी सखी…
ब्लाॅक || BLOCK || MARATHI ESSAY ||

ब्लाॅक || BLOCK || MARATHI ESSAY ||

ब्लॉक..!! कदाचित नात्यांमधे बोलण्यास काहीच नाही उरल्यावर शेवटचा पर्याय म्हणजे ब्लाॅक. सोशल नेटवर्किंगवर बोलताना कित्येक वेळा याचा अनुभव सगळ्यानाच येतो.…
खड्ड्यातुन रस्ता || POTS || ROADS ||

खड्ड्यातुन रस्ता || POTS || ROADS ||

कोणीच काही बोलत नाही मनके गेले झिजून खड्ड्यातून चालतो आम्ही आता सवय झाली सोसून कधी इकडुन खड्डा दिसतो जातो त्याला…
एक होते लोकमान्य || LOKAMANYA TILAK |

एक होते लोकमान्य || LOKAMANYA TILAK |

स्वतच्या शाळेत " Dogs & british are not allowed !!" म्हणत ब्रिटिशांच्या विरूद्ध स्वांतंत्र्याच युद्ध करणारे ते लोकमान्य. अरे कोण…
बार्शी @ 0 किलोमीटर || BARSHI MARATHI ESSAY ||

बार्शी @ 0 किलोमीटर || BARSHI MARATHI ESSAY ||

भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे…
लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

लोक काय म्हणतील || MARATHI LEKH ||

लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण…
मनाचा गोंधळ || MANACHA GONDHAL ||

मनाचा गोंधळ || MANACHA GONDHAL ||

किती विचार आणि किती लिहावे व्यर्थ सारे वाहून जावे. नसेल अंत या लिखाणास कुठे तर स्वतःस का मग जाळून घ्यावे?
प्रजासत्ताक दिनी || REUBLIC DAY || INDIA ||

प्रजासत्ताक दिनी || REUBLIC DAY || INDIA ||

लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून…
एक पत्र || LETTER || MARATHI ESSAY ||

एक पत्र || LETTER || MARATHI ESSAY ||

कदाचित हे पत्र तुला मिळाल्यावर तू थोडा अचंबित होशील, की हे पत्र मला कसे काय आले. आणि कोणी पाठवले. तर…

Comments are closed.

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.